दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु

PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर नव्या बायोपिकची चर्चा सुरु झाली आहे. या बायोपिकमध्ये दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता पीएम मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचंही बोललं जातंय.

राजीव कासले | Updated: May 20, 2024, 10:14 AM IST
दक्षिणेचा 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद्र मोदींची भूमिका? नव्या बायोपिकची चर्चा सुरु title=

PM Modi Biopic : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. याआधी पीएम मोदी (PM Modi) यांच्या जीवनावर एक चित्रपट आला होता. यात अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) भूमिका साकारली होती. आता लकरच पीएम मोदी यांच्या जीवनावर आधारीत नवा बायोपिक (BioPic) येणार असल्याची चर्चा आहे.  या बायोपिकमध्ये दक्षिणेचा प्रसिद्ध अभिनेता पीएम मोदी यांची भूमिका साकारणार असल्याचंही बोललं जातंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाहुबली चित्रपटाली कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते सत्यराज पीएम मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सत्यराज साकारणार भूमिका
अभिनेते सत्यराज (Satyaraj) यांची बाहुबली चित्रपटातील कटप्पाची भूमिका प्रचंड गाजली होती. याशिवाय रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्स्प्रेसमध्ये सत्यराज यांनी दीपिका पादुकोनच्या वडिलांची भूमिका केली होती. आता सत्यराज नव्या भूमिकेसाठी सज्ज झालेत. सत्यराज यांच्या आधी विवेक ओबरॉय यांनी पीएम मोदी यांच्या  बायोपिकमध्ये काम केलं होतं. 

याशिवाय उरी, आर्टिकल 370 सारख्या चित्रपटांमध्ये पीएम मोदी यांची भूमिका वेगवेगळ्या अभिनेत्यांनी साकारली आहे. त्यांची भूमिका लहान होती पण चाहत्यांच्या पसंतीस पडली होती. आता सत्यराज यांच्या भूमिकेला प्रेक्षकंचा कसा प्रतिसाद लाभतो हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

याच वर्षी सुरु होणार चित्रीकरण
मिळालेल्या माहितीनुसार पीएम मोदी यांच्या बायोपिकचं चित्रीकरण याच वर्षात सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय. पण चित्रपटाविषयची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. या चित्रपटात इतर कलाकार कोण असणार, याशिवाय क्रू आणि तंत्रज्ञान टीम कोणती असणार याचीही माहिती समोर आलेली नाही.दरम्यान, अभिनेते सत्यराज आपल्या आगामी दक्षिणात्य चित्रपटात व्यस्त आहेत.