सबसे कातिल गौतमी पाटिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. गौतमी आज एक स्टार आहे. तिचे लाखो चाहते असून तिला पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. बऱ्याचवेळा तिला या गर्दीतून वाचवण्यासाठी बाऊंसर्सची गरज भासते. एक व्हिडीओ शेअर करत गौतमी पाटिलने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

Updated: Aug 30, 2023, 04:58 PM IST
सबसे कातिल गौतमी पाटिलच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज title=

मुंबई : चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी गौतमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. गौतमीने एखादी पोस्ट शेअर करताच ती अवघ्या काही वेळातचं व्हायरल होते. नुकताच एक व्हिडीओ गौतमीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. जो पाहून तुम्हालाही आनंद होईल. 

एक व्हिडीओ शेअर करत गौतमी पाटिलने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. हा व्हिडीओ शेअर करत गौतमी म्हणाली की, नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी गौतमी पाटील. आज सायंकाळी साडे सात वाजता माझं एक नवीन साँग येत आहे. त्या साँगचं नाव आहे माझा कारभार सोप्पा नसतोय रं. हे साँग रेक्स स्टुडियो या यूट्यूब चॅनलवर येत आहे. या साँगची निर्मीती रत्नदिप कांबळे यांनी केली आहे. तर सर्वांनी आवर्जून हे साँग बघावे. या साँगमध्ये मी तुम्हाला एका रुपात दिसणार आहे. तर सर्व प्रेक्षक वर्ग, महिला वर्ग सर्वांनी साँग आवर्जून बघा आणि तुमचं प्रेम माझ्यावर कायम आहे. आणि कायम राहू द्या. आणि तेवढंच जास्त साँगलाही प्रेम द्या. धन्यवाद.

हा व्हिडीओ शेअर करत गौतमीने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, Countdown begins जेवढी दिसते सादी भोळी हि त्याच्या Double तिखट हाई  सादर करीत आहोत सबसे कातिल गौतमी पाटील यांचा अनोखा अंदाज, माझा कारभार सोपा नसातोय र...

गौतमी पाटिलचं नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौतमीचा नवा अंदाज पाहण्यासाठी तिचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. अनेकांनी गौतमीच्या या पोस्टवर कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की,  खास तुमच्या साठी घेऊन आलो आहोत "माझा कारभार सोपा नसतोय र् ", ते हि तुम्हा सर्वांच्या लाडक्या सबसे कातिल गौतमी पाटील यांच्या हटके Style मध्ये, Full Song लवकरच येत आहे, जास्तीत Share करा आणि हो Reels बनवायला विसरू नका, Teaser कसा वाटला हे Comment करून नक्की सांगा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमामुळे चर्चेत असते. गौतमी आज एक स्टार आहे. तिचे लाखो चाहते असून तिला पाहण्यासाठी खूप गर्दी करतात. बऱ्याचवेळा तिला या गर्दीतून वाचवण्यासाठी बाऊंसर्सची गरज भासते. बऱ्याचवेळा तिच्या कार्यक्रमात राडे देखील होतात. तर अश्लील डान्स करते असं म्हणत अनेक लोक तिला ट्रोलही करतात. तर काही लोक तिचा कार्यक्रम बंद करा अशी मागणी करतात. पण तरी तिच्या चाहत्यांची लिस्टमध्ये रोजच्या रोज संख्या वाढत आहे.