बँक खाती, डायऱ्या, पुरावे! बंद लॉकरमध्ये Sonali Phogat यांच्या मृत्यूचं रहस्य?

सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत.   

Updated: Sep 4, 2022, 01:25 PM IST
बँक खाती, डायऱ्या, पुरावे!  बंद लॉकरमध्ये Sonali Phogat यांच्या मृत्यूचं रहस्य? title=

मुंबई : भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांचे पथक शनिवारी हिसारमध्ये थांबू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस याठिकाणी पुरावे गोळा करणार आहेत. सोनाली फोगट यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवे खुलासे समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट यांची आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाती आहेत. दुसरीकडे, सुधीर पाल सांगवानचे बंधन बँकेत खाते आहे. याप्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत. 

यापूर्वी गोवा पोलिसांच्या पथकाने सोनाली फोगटच्या संत नगर येथील निवासस्थानी दोनदा चौकशी केली. पहिल्या दिवशी केवळ दीड तास चौकशी केली, मात्र त्यांच्या हाती एकही पुरावा हाती लागला नाही. पण दुसऱ्या दिवशी तपास केल्यानंतर त्याठिकाणी तीन डायऱ्या आणि लॉकर सील करण्यात आले आहेत.  (Sonali Phogat Death case)

सोनाली फोगट यांच्याच्या तीन डायऱ्या गोवा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या डायरीमध्ये फक्त सोनाली फोगट यांची भाषणे, पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांचे फोन नंबर आणि काही खर्च आहे.  तर लॉकरचा पासवर्ड अद्याप पोलिसांना कळालेला नाही. 

सोनालीच्या लॉकरचा पासवर्ड सुधीर सांगवानला माहीत होता. गोवा पोलिसांशी व्हिडीओ कॉलवर चौकशीदरम्यान त्याने दोन पासवर्ड सांगितलं. यामध्ये एक पासवर्ड तीन अंकी आणि दुसरा सहा अंकी होता. मात्र, या दोन्ही पासवर्डने लॉकर उघडलं नाही. यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लॉकर सील केले आहेत.

सोनाली फोगट यांच्या संपत्तीवर सुधीरची नजर
सोनालीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर सुधीरची बारीक नजर असल्याचं गोवा पोलिसांनी यापूर्वी उघड केलं. सुधीरला सोनालीचे फार्महाऊस 20 वर्षांसाठी कोणत्याही किंमतीत भाडेतत्त्वावर घ्यायचं होतं. त्याला दरवर्षी केवळ 60 हजार रुपये देऊन हा करार पक्का करायचा होता.

कुटुबियांचा गंभीर आरोप (Sonali Phogat family)
सांगवानने सोनाली फोगाटला याआधीही विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप सोनाली फोगाटच्या कुटुंबियांनी केला होता. सांगवानचा सोनालीच्या मालमत्तेवर डोळा होता असा आरोपही त्यांनी केलाय. 

सोनाली यांच्या गुरुग्राम फार्महाऊसवर सुधीर सांगवानने कब्जा केला होता. सोनालीच्या गोवा दौऱ्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा दावाही तिच्या कुटुंबियांनी केला आहे.