मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य

Sidharth Malhotra आणि Kiara Advani यांच्या लग्नाच्या गोड बातमीवर हे काय बोलून गेली राखी सावंत...

Updated: Feb 12, 2023, 04:31 PM IST
मला किळस येते; सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नावर Rakhi Sawant चं वक्तव्य title=

Rakhi Sawant On Sidharth - Kiara Wedding : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा (Kiara Advani) शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर दुसरीकडे बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचं विस्कळीत वैवाहिक जीवन चर्चेत आहे. दोघेहे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, आता राखीनं सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

राखी पापाराझींशी बोलताना सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाविषयी बोलली आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांचं लग्न झालं ही खूप चांगली आणि आनंदाची बातमी आहे. पण माझं वैवाहिक जीवन खूप वाईट सुरु आहे. मला खूप वाईट वाटतंय. कोणाच्या लग्नाला पाहिलं की मला किळस येते. कोणत्याही लव्ह बर्ड्सला पाहिलं की मला रडायला येतं. 14 फेब्रुवारी व्हॅलेन्टाइन्स डे येतोय. माझं हृदय रडतयं. राखीचा हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्या सुरुवात केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखीच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ही पोरगी आता सिद्धार्थ आणि कियाराच्या रिलेशनशिपला नजर लावेल. काही नेटकऱ्यांनी कमेंट करत राखीला ड्रामेबाज म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत राखीची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. 

आता राखीचा पती आदिलवर बलात्कार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याआधी राखीनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, आदिलने तिचे दागिने चोरले आणि तिचे पैसेही चोरले. राखीनं तिच्या आईच्या मृत्यूसाठी आदिलला जबाबदार ठरवले. त्यानं सांगितले की, मराठी बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी तिनं आदिलला 10 लाखांचा चेक दिला होता, त्यामुळे त्याच्या आईवर शस्त्रक्रिया करावी लागली, पण आदिलने ते पैसे तिच्या आईच्या उपचारासाठी खर्च केले नाहीत, त्यामुळे तिच्या आईचा मृत्यू झाला.

हेही वाचा : Sidharth-Kiara लग्नानंतर 70 कोटींच्या 'या' आलिशान बंगल्यात राहणार, पाहा Video

दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर ते दोघं 7 फेब्रुवारी 2022 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेतल्या आहेत. सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले