Sunny Deol Hanuman : हनुमानची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलेने फीमध्ये केली कपात

'रामायण' या पौराणिक चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता, नुकत्याच आलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने त्याच्या फीच्या रक्कमेत घट केली आहे.

Updated: Oct 27, 2023, 02:20 PM IST
Sunny Deol Hanuman : हनुमानची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलेने फीमध्ये केली कपात title=

मुंबई : सनी देओल बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलीवूडमध्ये तीन दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या या अभिनेत्याने इंडस्ट्रीला 90 हून अधिक उत्तम चित्रपट दिले आहेत.  'गदर 2' हा त्याचा शेवटचा रिलीज सिनेमा होता, ज्याने त्याला प्रचंड यश मिळवून दिलंय. या चित्रपटातील त्याच्या मास्टरक्लास अभिनयामुळे तो कायमच चर्चेत असतो. त्याचबरोबर, आता बातम्या येत आहेत की सनी देओल रणबीर कपूरसोबत नितीश तिवारीच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. एका नवीन अहवालानुसार सनीने पौराणिक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली आहे. 

'रामायण' या पौराणिक चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता, नुकत्याच आलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने त्याच्या फीच्या रक्कमेत घट केली आहे. अभिनेत्याच्या जवळच्या सूत्राने एका न्यूज पोर्टलला सांगितलं की, सनी देओलने यासाठी भरघोस फीची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितेश तिवारीच्या चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओल ४५ कोटी रुपये मानधन घेत आहे. याआधी अभिनेत्याने त्याची फिस ५० कोटी असल्याचं आपण ऐकलं होतं. त्यामुळे या सिनेमासाठी ५ कोटींची सूट दिल्याचं दिसत आहे.

सुत्राने असंही सांगितलं की सनीला 'रामायण'च्या शूटिंग दरम्यान कोणताही प्रोजेक्ट हाती घ्यायचा नव्हता कारण त्याला त्याचं सगळं लक्ष त्याच प्रोजेक्टवर केंद्रित करायचं आहे. वृत्तांवर विश्वास ठेवयाचा झाला तर सनी 'रामायण' चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी त्याचा बॉडी टाइपदेखील बदलणार आहे. तरी,अभिनेत्याच्या बाजूने या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. सूत्रानुसार, 'भगवान हनुमानाची भूमिका पडद्यावर साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि सनीने रामायणाच्या शूटिंगदरम्यान कोणताही प्रोजेक्ट हाती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला त्याच्या व्यक्तिरेखेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि भगवान हनुमानाचं पात्र साकारण्यासाठी तो त्याचा बॉडी टाइपदेखील बदलणार आहे.

अहवालात पुढे असा दावा करण्यात आला आहे की, ' सध्या त्याची फीसाठी बोलणी सुरु आहेत. रामायणसाठी नितीश तिवारी आणि मधु मंटेना यांच्यासोबत सनीची ४५ कोटी रुपयांची डील होऊ शकते. हनुमानाची भूमिका साकारणारा सनी देओलने हनुमानाला जीवनातील सर्व यश दिल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. सनी देओल एका अॅक्शन फिल्मसाठी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एका मोठ्या निर्मात्याशी बोलणी करत असल्याचंही सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. यासाठी सनीने 75 कोटी रुपये फीची मागणी केल्याचं वृत्त आहे.

याआधी सनी देओलने त्याची फी ५० कोटींपर्यंत वाढवल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, खुद्द सनीनेच या बातम्यांवर मौन सोडत मोठा खुलासा केला आहे. सनीने असंही म्हटलं आहे की, कलाकार केवळ चित्रपटासाठी किती मदत करत आहेत यावर लक्ष केंद्रित करून फी घेवू शकतो.  सनीने असंही सांगितलं की, जर निर्माते त्याला मोठी रक्कम देण्यास तयार असतील तर त्यांना याची काही अडचण नसते.  त्याने पुढे असंही स्पष्ट केलं की, त्याला अशा परिस्थितीत राहायला आवडतं जिथे तो कोणत्याही प्रोजेक्टचं ओझं बनत नाही.