'रामायणा'त सनी देओलची एन्ट्री, रणबीर कपूरसोबत साकारणार खास भूमिका?

Sunny Deol as Hanuman: बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे. गदर -2 ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता सनी देओल वेगळ्यात भूमिकेत दिसणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 11, 2023, 12:18 PM IST
'रामायणा'त सनी देओलची एन्ट्री, रणबीर कपूरसोबत साकारणार खास भूमिका? title=
Sunny Deol To Play Hanuman In Ranbir Kapoor Starrer ramayana

Sunny Deol as Hanuman: बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) अलीकडेच गदर-2 (Gadar-2) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी सनीपाजीच्या या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने 540 कोटींची कमाई केली होती. त्यातच आता सनी देओलच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. सनी देओल लवकरच पौराणिक भूमिका साकारताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नितेश तिवारीचा आगामी चित्रपट रामायणात (Ramayana) हनुमानाची (Hanuman) भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारीच्या आगामी रामायणात भगवान हनुमानाची भूमिका साकारण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चादेखील झाली आहे. दिग्दर्शक नितेश आणि सनी देओल यांच्यात हनुमानाच्या भूमिकेविषयी चर्चा झाली आहे. 

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, नितेश तिवारी यांच्या रामायणात रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. तर, सीतामातेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत यश हे दिसणार आहेत. तर, भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओल यांच्यासोबत चर्चा सुरू असून त्याने होकार दिला असल्याची माहिती समोर येतेय. 

भगवान हनुमान हे शक्ती आणि बल याचे प्रतीक आहेत आणि दिग्दर्शकांच्या मते, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सनी देओल यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी परफेक्ट नाहीये व दुसरं कोणी या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही. म्हणूनच या भूमिकेसाठी सनी देओलला विचारण्यात आलं आहे. 

दरम्यान, गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांचा चित्रपट गदरची रामायणासोबत तुलना केली होती. अनिल यांच्यामते, गदर एक प्रेम कथा खरंतर रामायणापासून प्रेरित आहे. गदर-2च्या सक्सेकनंतर एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. तेव्हा बोलताना ते म्हटले होते की, गदर काय आहे? गदरचा पहिला भाग हा रामायणच आहे. रामजी सीतामातेला सोडवण्यासाठी लंकेत जातात. मला वाटतं की गदरचा पहिला भाग हा रामायणच आहे आणि त्यामुळंच हा चित्रपट फ्लॉप होणार नाही कारण या सिनेमाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.