बाबो! एकाच चित्रपटात दिसणार सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी...

Gautami Patil, Sunny Leone and Sapna Choudhary  : गौतमी पाटील, सनी लियोन आणि सपना चौधरी एकाच चित्रपटात झळकणार...  

दिक्षा पाटील | Updated: May 9, 2024, 12:36 PM IST
बाबो! एकाच चित्रपटात दिसणार सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी...  title=
(Photo Credit : Social Media)

Gautami Patil : सोशल मीडियामुळे सगळ्यांच्या काळजाचा ठोका बनलेली गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. खरंतर गौतमीनं डान्सर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली. मात्र, अनेकांनी तिच्या डान्समुळे तिच्यावर टीका देखील केली. गौतमीच्या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येत लोक असतात. आता गौतमी पाटील ही ‘द महाराष्ट्र फाइल्स’ या आगामी चित्रपटातील गाण्यात दिसणार आहे. गौतमीला नेहमी आपण सगळ्यांनी पारंपारिक वेशभूषेत दिसायची. मात्र, आता गौतमीचा या गाण्यातील लूक समोर आला आहे. 

‘द महाराष्ट्र फाइल्स’ या चित्रपटाची निर्मिती संजीवकुमार राठोड यांनी केली आहे. लक्ष वेधी गोष्ट म्हणजे या चित्रपटातील हिंदी गाण्यावर गौतमी डान्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या गाण्यात गौतमी ही डान्सबार गर्लच्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. 'द महाराष्ट्र फाईल्स' हा चित्रपट देशात आणि जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी, नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशील राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवि धनवे, प्रमोद गायकवाड यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला संगीत नितीन-अजित, सिदार्थ कश्यप, संजय लोंढे यांनी दिले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा चित्रपट कुठल्याही राजकीय पार्टीचा अजेंडा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. सर्वसामान्य शेतकरी, विधवा महिला, विद्यार्थी यांची फाइल असून सर्व राजकिय पक्षांनी, सर्व सरकारी व प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकत्यांनी आवर्जून पहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : 'लग्नाची पत्रिका छापली, कपडे घेतले, दागिने बनवले अन्...'; म्हणून 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं लग्न मोडलं

कला दिग्दर्शन उल्हास नान्द्रे व जगन्नाथ हातनकर व अफसर खान यांनी केले आहे गायन अजय अतुल फेम अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, साक्षी होळकर, अमरिश आणि शांताबाई फेम संजय लोंढे, यांनी केले आहे. या चित्रपटाची सहनिर्माती शालीनी राठोड व रोहीत चौधरी यांनी केली आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे शांताबाई या फेमस गाण्यावर सनी लिओनी थिरकणार आहे. हरियाणाची डान्सर सपना चौधरी पहिल्यांदा तर मराठमोळ्या रूपात दिसणार आहे.