इंस्टाग्रामवर झाली मैत्री, व्हिडिओ कॉलवर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक घटना समोर

Rajsthan Crime News: अश्लिल फोटो आणि व्हिडिओ (Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पीडितेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Updated: Jun 20, 2023, 11:42 AM IST
इंस्टाग्रामवर झाली मैत्री, व्हिडिओ कॉलवर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्... धक्कादायक घटना समोर title=
school girl video Crime News

Girl Obscene Video Crime News: एक 16 वर्षांची तरुणी तिच्या मोठ्या बहिणीसह आणि विधवा आईसह सुजनगड तहसीलच्या ग्रामीण भागात राहत होती. आईच्या मोबाईलवर तिने इन्टाग्राम अकाऊंट (Instagram account) उघडलं. नेहमीप्रमाणे मोबाईल चाळत असताना दिला एका मुलाच्या नावाची रिक्वेस्ट आली. हळूहळू चॅटिंग सुरू झाली आणि गप्पा रंगू लागल्या. नागौर जिल्ह्यातील राजेंद्र उर्फ​राजू नावाच्या मुलाशी तिचं बोलणं होत होतं. त्यावेळी राजूने एक ऑडिओ कॉल केला आणि संभाषण रेकॉर्ड (Call Record) केलं. त्यावेळी काही अश्लिल संभाषण झाल्याने राजूने संधी साधून खरे रंग दाखवले. भेटायला ये नाहीतर संभाषण व्हायरल करेल, अशी धमकी मुलीला दिली. त्यावेळी तुझा कॉलिंगचा नंबर दे, अशी मागणी देखील त्याने केली. राजेंद्रने मला घाबरवून माझा मोबाईल नंबर घेतला, असा आरोप मुलीने केलाय. प्रकरण इथंच थांबलं नाही...

राजेंद्रने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल (Video Call) करायला सुरुवात केली. सकाळी 9 वाजता शाळेत जात असताना राजेंद्र कार घेऊन भेटायला येत आणि मुलीला धमकी देत असत. पहिल्यांदा त्याने तिच्याच मोबाईलमध्ये दोघांचा सेल्फी घेतला आणि फोटो पाठवण्यास सांगितलं. अनेकदा त्याने माझ्यासोबत फिरायला चल, असं देखील म्हणाला. पण मुलीने नकार दिल्याने राजूचा पारा चढला. 5 ते 6 दिवसानंतर राजेंद्र गाडी घेऊन आला, तरुणी शाळेतून घरी जात असताना वाटेत त्यानं जबरदस्तीने उचलून गाडीत बसवलं.

तरुणीला हॉटेलमध्ये नेऊन धमकावलं, तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून माझ्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ (Obscene Video) देखील बनवला. कोणाला सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) करेल, अशी धमकी देखील दिली आणि मुलीला सोडून निघून गेला. 20 दिवसानंतर पुन्हा हॉटेलवर नेऊन दुष्कर्म केलं. तरुणीचा पारा चांगलाच चढला. काही दिवसानंतर राजू पुन्हा घराबाहेर फिरत असताना तरुणीला बोलवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तरूणीने आरडाओरड केल्याने राजूने पळ काढला.

आणखी वाचा - तुझे आजारपण दूर करतो म्हणत महिलेला भुलवले, नंतर भोंदू बाबाने केला अमानुष प्रकार

दरम्यान, आईने कारण विचारताच तरुणीच्या अश्रूचा बांध फुटला. तरुणीने आईला आणि मामाला सर्व घटनाक्रम सांगितला. आई आणि मामाने थेट पोलीस चौकी गाठली आणि तक्रार नोंदवली. राजेंद्रने मला अनेक वेळा धमक्या देऊन माझ्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले, असं तरुणीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणात कसून चौकशी केली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.