भारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?

EAC-PM Study : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) एक अहवाल सादर केला आहे. यानुसार 1950 ते 2015 म्हणजे गेल्या 65 वर्षात हिंदू लोकसंख्येत 7.8% ने घट झाली आहे. तर भारताच्या लोकसंख्येत अल्पसंख्याकांची टक्केवारी वाढली आहे. शेजारच्या पाकिस्तान आणि बांगलादेशातही बहुसंख्य लोकसंख्येतील मुस्लिमांचा वाटा वाढला आहे.

राजीव कासले | Updated: May 9, 2024, 05:14 PM IST
भारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली? title=

EAC-PM Study : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC-PM) अभ्यासानंतर एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतात गेल्या 65 वर्षात हिंदूंची लोकसंख्या घटली आहे. देशातील बहुसंख्य धर्म असलेल्या हिंदूंची लोकसंख्या (Hindu Population) 1950 ते 2015 दरम्यान 7.8% ने घटली आहे. पण शेजारील देशांमध्ये बहुसंख्य समुदायाच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अहवालानुसार भारतात हिंदूंची संख्या कमी आहे. याऊलट मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख समाजाबरोबर अल्पसंख्याकांची टक्केवारी वाढली आहे. पण यात जैन आणि पारसी समाजाची लोकसंख्या कमी आहे. 

1950 ते 2015 दरम्यान भारतात मुस्लीमांच्या लोकसंख्येत (Muslim Population) तब्बल  43.15% झाली आहे. ख्रिश्चनांमध्ये 5.38%, शीखांमध्ये 6.58% आणि बौद्ध लोकसंख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. 

मुस्लीम लोकसंख्येत वाढ
अभ्यासानुसार 1950 मध्ये भारताच्या लोकसंख्येती हिंदू समाजाची टक्केवारी 84% इतकी होती. तर 2015 पर्यंत यात घट होऊन ती 78% इतकी झाली आहे. याकाळातच मुसलमानांची संख्या 9.84% हून वाढून 14.09% इतकी झाली आहे.  म्यानमारनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे ज्यांच्या बहुसंख्य टक्केवारीत घट झाली आहे म्यानमारमध्ये बहुसंख्य समुदायात 10%  आणि भारतात 7.8% ने कमी झाली आहे. भारताव्यतिरिक्त नेपाळमध्येही बहुसंख्य असलेल्या हिंदू समुदायाच्या लोकसंख्येमध्ये 3.6% ची घट दिसून आली आहे.

भारतात मुसलमानांच्या लोकसंख्येत वेगाने वाढ
हा अहवाल 2024 मध्ये जारी करण्यात आला होता. यात जगभरातील 167 देशातील लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला होता. जागतिक ट्रेंड पाहता भारतात स्थिरता दिसून आली आहे.  आकडेवारीनुसार की भारतातील अल्पसंख्याक केवळ सुरक्षित नाहीत, तर त्यांच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

पाकिस्तान, बांगलादेशात बहुसंख्यक मुस्लीम समुदायात वाढ
भारतात बहुसंख्यक असलेल्या हिंदू समुदायात घट नोंदवण्यात आली आहे. शेजारच्या पाकिस्तान आणि बांगलादेशात मात् बहुसंख्यक समुदाय वाढ झाली आहे. बांगलादेशमध्ये मुस्लीम लोकसंख्येत 18.5% वाढ झाली आहे. तर पाकिस्तानात 3.75% आणि अफगानिस्तान 0.29% वाढ झाली आहे. 1971 मध्ये बांगलादेश वेगळा देश झाल्यानंतर मुस्लीम लोकसंख्येत 10% वाढ नोंदवण्यात आली आहे. 

म्यानमारमध्ये बौद्धांच्या संख्येत घट
भारताचा शेजारचा देश असलेल्य म्यानमारध्ये बहुंसख्या समुदयाच्या लोकसंख्येत सर्वात जास्त घट झाल्याचं अहवालाता सांगण्यात आलं आहे. म्यानमारमध्ये थेरवाद बौद्धांची संख्या जास्त आहे. पण गेल्या 65 वर्षात यात 10 टक्के घट झाली आहे. भारत आणि म्यानमारबरोरच नेपाळमध्ये बहु्संख्य हिंदूंची लोकसंख्या 3.6% टक्क्यांनी घटलीय. मे 2024 च्या अभ्यासानुसार बहुसंख्या बौद्ध लोकसंख्या असलेल्या भूतान आणि श्रीलंका देशात अनुक्रमे 7.6% आणि 5.25% वाढ झाली आहे. 

अहवालानुासर ऑस्टेलिया, चीन, कॅनडा, न्यूझीलंड आणि पूर्व आफ्रिकेतील काही देशआंमध्ये बहुसंख्या समुदायात भारताच्या तुलनेत जास्त घट झाली आहे.