न्या. दीपक मिश्रा आज घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ

देशाचे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती दीपक मिश्रा पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 28, 2017, 07:20 AM IST
न्या. दीपक मिश्रा आज घेणार सरन्यायाधीश पदाची शपथ title=

नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायमूर्ती दीपक मिश्रा पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. 

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद न्यायमूर्ती मिश्रांना सकाळी नऊ वाजता शपथ देतील. गेल्या आठवड्यात शुक्रवारी न्यायमूर्ती जे एस खेहर निवृत्त झाले. त्यांच्या जागी न्यायमूर्ती मिश्रा सरन्यायाधीशपदाची धुरा खांद्यावर घेतील. 

न्यायमूर्ती मिश्रांना साधारण १३ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. याआधी न्या. मिश्रांनी पाटाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी काम केलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना दिवाणी आणि फौजदारी वकीलाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

१९९६ मध्ये ओडिशा उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची पहिल्यांदा नियुक्ती झाली. तेव्हापासून त्यांनी देशातल्या विविध न्यायालयात न्यायमूर्ती दीपक मिश्रांनी विविध पदे भूषवली आहेत.