महाराष्ट्रातील 'या' गावात गाढविणीच्या एक लीटर दूधाचा भाव चक्क 20 हजार, फायदे वाचून थक्क व्हाल!

Donkey Milk Price In Maharashtra: गाढविणीचे दूध चक्क 20 हजार रुपये लिटर रुपयांना विकले जाते. ऐकून थक्क झालात ना. महाराष्ट्रातील एका गावात चक्क 20 हजार रुपयांना विक्री होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 22, 2023, 12:42 PM IST
 महाराष्ट्रातील 'या' गावात गाढविणीच्या एक लीटर दूधाचा भाव चक्क 20 हजार, फायदे वाचून थक्क व्हाल! title=
Donkey milk sells for Rs 20000 per litre in Maharashtra s latur village

वैभव बालकुंदे, झी मीडिया

Donkey Milk Price In Maharashtra: भारतात गाढवांचा उपयोग ओझं वाढण्यासाठी व पूर्वी कुंभारांकडेही मातीची भांडी घडवण्यासाठी गाढव पाळले जायचे. मात्र, आता गाढव पाळली जात नाहीत. पण गाढवांबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गाढविणीच्या दुधाबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का. तुम्हाला माहितीये का गाढविणीच्या दुधाची किंमत हजारोंच्या घरात आहे. महाराष्ट्रात आज गाढविणीच्या दुधाचा चक्क 20 हजार रुपये लिटर भाव मिळाला आहे. 

दूध म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते गाय, म्हशी किंवा शेळीचे दूध. गेल्या कित्येत वर्षांपासून गायीचे दूध वापरलं जातं. लहान मुलांनाही गायीचे दूध प्यायला देतात कारण द्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. पण तुम्हाला माहितीये का गायीच्या दुधापेक्षा गाढविणीचे दूध आरोग्यासाठी दुप्पट फायदेशीर आहे. गाढविणीच्या दुधात अनेक आरोग्यवर्धक गुण असतात असं म्हटलं जातं. त्यामुळंच इतर प्राण्यांच्या तुलनेत गाढविणीचे दूध महाग विकले जात आहे. 

गाढविणीच्या दुधाचा चक्क 20 हजार रुपये दराने विकले जात आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे चक्क गाढविणीचे दूध 20 हजार रुपये लिटरने विकले जातेय. इतकंच नव्हे तर, दुधाच्या विक्रीसाठी भोंगा लावून ग्राहकांना आकर्षिक केले जात आहे. गाढविणीच्या दुधाचे अनेक फायदे असल्याचे सांगितले जात आहे. 

गाढविणीच्या दुधाचे फायदे

गाढविणीच्या दुधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ व न्यूमोनिया हे आजार होत नाहीत. शक्यतो लहान मुलांना असे आजार होऊ नयेत व झाल्यास ते बरे होण्यासाठी गाढविणीचे दूध खूप गुणकारी आहे. असा दावा ही हे लोक करत आहेत. 

गाढविणीच्या दुधातील औषधी गुणधर्म

गाढविणीच्या दुधात एक विशिष्ट्य प्रकारचे प्रोटीन असते ज्यामुळं आरोग्याला त्याचा लाभ होतो. हे दूध मानवी दुधासारखं असून त्यात प्रोटीन आणि चरबीचे प्रमाण कमी असते पण लॅक्टॉक्स मोठ्या प्रमाणावर आढळले जाते. या दुधात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असल्याने या दूधाचा वापर सौंदर्य प्रसाधन आणि औषध निर्मिती क्षेत्रातही होतो. 

गाढविणीच्या दुधात लॅक्टॉज, व्हिटॅमिन ए, बी-1, बी-2, बी-6, व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-ई यांचाही समावेश असतो. 

क्लिओपात्रा वापरायची गाढविणीचे दुध

प्राचीन इजिप्तची राणी क्लिओपात्रा आपलं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी गाढविणीच्या दूधानं आंघोळ करायची, अशी आख्यायिका सांगितली जाते.