Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची ठाम भूमिका

Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलेला असतानाच आता राज्यभर सुरु असणारं मराठा आरक्षणाच्या हेतूनं केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे.   

सायली पाटील | Updated: Feb 2, 2024, 12:02 PM IST
Maratha Reservation : मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची ठाम भूमिका  title=
maratha reservation survey Maratha arakshan latest news manoj jarange

Maratha Reservation News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक घडामोडी सुरु असतानाच आता मराठा आरक्षण सर्वेक्षणासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आरक्षण सर्वेक्षणाला सरकारनं मुदतवाढ नाकारली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यत संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करावं अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. 

राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणात आतापर्यंत 2 कोटी 12 लाखांहून अधिक घरांचा सर्वे पूर्ण झाला आहे. या सर्वेक्षणाचा शुक्रवार अखेरचा दिवस असून या सर्वेक्षणाचा अहवान शनिवारी सुपूर्द करणं अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सचिव यांची ऑनलाईन बैठकही पार पडली. या बैठकीत संपूर्ण सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला. 

शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करुन शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आयोगाकडे पाठवण्याच्या सूचनाही शासनाकडून करण्यात आल्या आहेत. मुदतवाढ मिळाली नसल्यामुळं आता मराठा समाज संघटनांकडून यावर नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

जरांगे पाटील गावाकडे परतले... 

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) कैक दिवसांनंतर जालन्यातील आपल्या अंतरवाली सराटी गावी परतले आहेत. मनोज जरांगे पाटील स्वतः बुलेट चालवत आपल्या गावी रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत अनेक मराठा कार्यकर्ते देखील बाईक रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत होते. 

हेसुद्धा वाचा : Weather Updates : देशभरात थंडीमुळं 'मौसम मस्ताना'; पाहा राज्यात कुठं वाढणार गारठा

बऱ्याच दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावात परत येत असल्यानं गावकऱ्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारीही केल्याचं पाहायला मिळालं. मनोज जरांगेंसाठी खास रथही बनवण्यात आला होता. या रथातूनही गावात रॅली काढण्यात आली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही, असा निश्चय मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. 

भुजबळांविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक 

दरम्यान, मंत्री छगन भुजबळांविरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत असाल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा असा इशारा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी त्यांना दिला. मुख्यमंत्री शिंदेंचे प्रतिकात्मक पुतळे जाळले जाताहेत. हा प्रकार थांबवून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करायची मागणी मराठा ठोक मोर्चानं केली.