सावधान! पावसाळ्यात चाटचे पदार्थ खाणं टाळा

पावसाळा सुरू झालाय... पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. 

Updated: Jul 21, 2015, 02:51 PM IST
सावधान! पावसाळ्यात चाटचे पदार्थ खाणं टाळा title=

नवी दिल्ली : पावसाळा सुरू झालाय... पावसाळ्यात रोग प्रतिकारक क्षमता कमी झाल्यानं जीवाणूंचा हल्ला लगेच होतो. याच कारणामुळे बाहेरचे उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. 

पावसाळ्यात पचनक्रिया हळू होत असते त्यामुळं तळलेले पदार्थ खाऊ नये, नाही तर त्यानं अॅसिडिटी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
तुळस, आलं, पुदिना, हळद, हींग, जिरे, कढीपत्ता यांचं सेवन जेवणात अधिक प्रमाणात करावं. यामुळं पचनसंस्था मजबूत होईल तसंच पोटासंबंधातील विकारांपासून लांब ठेवतं. यामध्ये अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या होत नाहीत.

पोट साफ ठेवण्यासाठी थोड्या प्रमाणात मध खाणं उपयुक्त असतं. मध आतड्यांना साफ ठेवतं. मेथीदाणे, हळद आणि कारले यांचं संक्रमण केल्यामुळं जीवाणूंचं संक्रमण होत नाही. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आंबट आणि विटामिन-सी युक्त फळं खायला हवीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.