अन्नसुरक्षेसाठी काँग्रेसचा खासदारांना ‘व्हिप’

सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या महत्त्वाकांशी अन्नसुरक्षा विधेयकासाठी आज लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. अन्नसुरक्षा विधेयकासह आणखीही काही महत्त्वपूर्ण विधेयकं आज, लोकसभेत मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या विधेयकांच्या मंजुरीसाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांना दररोज हजर राहण्यासाठी काँग्रेस ‘व्हिप’ जारी केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 26, 2013, 08:22 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या महत्त्वाकांशी अन्नसुरक्षा विधेयकासाठी आज लोकसभेत चर्चा होणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. अन्नसुरक्षा विधेयकासह आणखीही काही महत्त्वपूर्ण विधेयकं आज, लोकसभेत मांडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या विधेयकांच्या मंजुरीसाठी काँग्रेसनं कंबर कसलीय. अधिवेशन संपेपर्यंत सर्व खासदारांना दररोज हजर राहण्यासाठी काँग्रेस ‘व्हिप’ जारी केलाय.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरू झाल्यापासून गोंधळामुळं कोणतंही कामकाज होऊ शकलं नाहीय. कोळसा गैरव्यवहारप्रकरणी महत्त्वांच्या फायलींचं गहाळ होणं, पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ला तसंच तेलंगणाच्या मुद्द्यावरुन विरोधक सतत आक्रमक पाहायला मिळाले. त्यामुळं अन्नसुरक्षा विधेयकावर काही चर्चा होऊ शकली नाही.
अन्नसुरक्षा विधेयकाव्यतिरिक्त भूसंपादन आणि पुनर्वसन विधेयक २०११, पेंशन निधी नियमन आणि विकास प्राधिकरण विधेयक २०११ यांचाही समावेश आहे. अनेक विधेयकांची मंजुरी सरकारला करुन घ्यायचीय. बुधवारी जन्माष्टमिनिमित्त संसदेच्या कामकाजाला सुट्टी राहणार आहे. त्यासाठी अधिवेशन ५ सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव असून, अद्याप त्यावर औपचारिक निर्णय झालेला नाही.
विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी अन्नसुरक्षा विधेयकाला पाठिंबा दर्शवला असला तरी लोकसभेत या विधेयका विरोधात मतदान करण्याची घोषणा अण्णाद्रमुकच्या नेत्या आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केलीय.

दरम्यान, उत्तर प्रदेशात विश्वच हिंदू परिषदेच्या 84 कोसी परिक्रमा यात्रेवरील बंदीमुळं निर्माण झालेला तणाव पाहता समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष तसंच भाजपकडून हा मुद्दा उपस्थित होण्याची आणि त्यावरून गोंधळ होण्याची आज शक्य,ता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.