'झलक'साठी मनिष पॉल किती मानधन घेतो, माहीत आहे?

'झलक दिखला जा' या कार्यक्रमातून पुन्हा एकदा चाहत्यांसमोर येण्यासाठी होस्ट मनीष पॉल तयार झालाय. 

Updated: Jul 9, 2016, 03:24 PM IST
'झलक'साठी मनिष पॉल किती मानधन घेतो, माहीत आहे? title=

मुंबई : 'झलक दिखला जा' या कार्यक्रमातून पुन्हा एकदा चाहत्यांसमोर येण्यासाठी होस्ट मनीष पॉल तयार झालाय. 

सलग पाचव्यांदा मनीष हा कार्यक्रम होस्ट करताना दिसणार आहे. पण, या कार्यक्रमासाठी तो किती मानधन घेतोय, याचा तुम्हाला अंदाजाही नसेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, या सीझनसाठी मनीषला तब्बल अडीच करोड रुपये मिळणार आहे. याचसोबत तो छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणारा नॉन बॉलिवूड होस्ट ठरणार आहे.

गेल्या सीझनमध्ये याच कार्यक्रमासाठी मनीषला १.५ कोटी रुपये मिळाले होते. पण, त्याची लोकप्रियता तसंच जजेस आणि स्पर्धकांसोबतचं मेतकूट पाहून चॅनलनं यंदाही मनिषलाच होस्ट म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. 

हा कार्यक्रम जवळपास चार महिने सुरू राहील. याप्रमाणे मनिषला प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास ७ लाख रुपये मिळणार आहेत.