Free Adhaar Card Update: आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आजच करा, कारण...15 जूनपासून पैसे

Free Adhaar Card Update Last Date: आधार कार्ड 10 वर्ष जुने झाले असल्यास अपडेट करा. आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आजच करा. कारण  फ्रीमध्ये अपडेट करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. 15 जूनपासून अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

| Jun 14, 2023, 11:26 AM IST
1/6

Free Adhaar Card Update  : तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल तर आज करणे आवश्यक आहे. कारण आज 14 जून 2023 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. ज्या व्यक्तींचे आधार कार्ड 10 वर्षे जुने आहे त्यांनी त्यांची माहिती अपडेट करण्याची शिफारस केली होती. तुमचा पत्ता, नाव आणि इतर तपशील तुमच्या आधार कार्डमध्ये अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे कोणतेही शुल्क न घेता तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.

2/6

आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आजच करा. कारण  फ्रीमध्ये अपडेट करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. 15 जूनपासून अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.

3/6

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट तेही विनामूल्य आज करता येणार आहे. UIDAI च्या माहितीनुसार तुमच्या आधार कार्डची वैधता टिकवून ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. गेल्या दहा वर्षांत तुमचे आधार कार्ड अपडेट केले नसल्यास तुमचा ओळख पुरावा आणि पत्ता ऑनलाइन अपडेट करावे लागणार आहे. https://myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि मोफत अपडेट सेवेचा लाभ घेऊ शकता.

4/6

UIDAI ने सांगितले आहे की आधार कार्ड अपडेट फक्त myAadhaar पोर्टल द्वारे केले जाऊ शकतात. तथापि, अंतिम मुदतीनंतर तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल.

5/6

आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे ते अपडेट केले नसेल तर करु घ्या. त्यासाठी काही गोष्टी फॉलो करा.

6/6

तुमचा पत्ता पुरावा मोफत अपडेट करण्यासाठी, या सोप्या टिप्स 1. myaadhaar.uidai.gov.in ला भेट द्या . 2. तुमच्या खात्यात लॉग इन करा आणि नाव, लिंग, जन्मतारीख आणि आधार अपडेटसाठी पर्याय निवडा. 3. आधार कार्ड ऑनलाइन अपडेटसाठी पर्याय निवडा. 4. तुमचा पत्ता तपशील निवडण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी पुढे जा. 5. आवश्यक माहिती स्कॅन करा आणि अपलोड करा. 6. सेवा विनंती क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी जतन करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक पुष्टीकरण संदेश प्राप्त होईल.