भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी,भूस्खलन, आणि... धोक्याची सूचना आधीच देणार NASA ISRO चा पावरफुल सॅटेलाईट

इस्रो आणि नासाच्या निसार उपग्रहामुळे नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याची सूचना आधीच मिळणार आहे. 

| May 17, 2024, 19:11 PM IST

NISAR  : भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासार्ख्या नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याची सूचना आधीच मिळणार आहे. भारताच्या इस्रो आणि अमेरिकेतल्या नासाने मिळून निसार नावाचा उपग्रह विकसीत करत आहे. लवकरच हा उपग्रह अवकाशात झेपवणार आहे. 

 

1/7

 भारताच्या इस्रो आणि अमेरिकेतल्या नासा एकत्र मोठ्या मोहिमेवर काम करत आहे.    

2/7

निसार उपग्रह तयार करण्याचे बजेट चांद्रयान 3 पेक्षा जास्त आहे. यासाठी 1.5 अब्ज डॉलर्सचे बजेट देण्यात आले. 

3/7

NASA सोबत, भारतीय शास्त्रज्ञांना देखील NISAR उपग्रह मोहिमेचा डेटा मिळणार आहे. 

4/7

यातील रडार इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे. हा उपग्रह 2600 किलो वजनाचा आहे.

5/7

 निसार उपग्रह भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची माहिती आणि अंदाज वर्तवणार आहे.   

6/7

या उपग्रहाद्वारे पृथ्वीच्या जमीन आणि बर्फांच्छादीत प्रदेशातल्या वातावरण बदलांचा सखोल अभ्यास करता येणार आहे. 

7/7

NASA ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) अर्थात निसार नावाचा उपग्रह विकसीत करत आहे.