टेंडर व्होटिंग नेमकं असतं तरी काय?

तुमच्या नावावर जर कुणी बोगस मतदान केलं असेल तर तुमच्या मतदानाच्या अधिकारावर गंडांतर येऊ शकतं. मात्र, गोंधळून जाऊ नका. पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला. त्यावेळी त्यांनी टेंडर व्होटिंग केले. 

| May 13, 2024, 23:01 PM IST

Tendered ballot :  निवडणुकांमध्ये बोगस मतदानाच्या अनेक घटना समोर येत असतात.. बोगस मतदानामुळे अनेक जण मतदानापासून वंचित राहतात.. मात्र आता तुम्हाला तुमच्या अधिकारापासून कुणीही वंचित ठेवू शकणार नाही.. संविधानाने दिलेला टेंडर व्होंटिंगचा हक्क तुम्ही बजावू शकता. देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सूरू आहे.. पुण्यातही सोमवारी चौथ्या टप्प्याचं मतदान झालं.. याच दरम्यान पुण्यातील एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे मतदानाला गेले, तेव्हा त्यांच्या नावावर आधीच कुणीतरी बोगस व्होटिंग केल्याचं आढळलं. अखेर निवडणूक अधिका-यांशी वाद घालून त्यांना टेंडर व्होटिंग करावं लागलं.

1/9

 निकालावर परिणाम करण्याइतपत अल्प तफावत असेल तरच टेंडर व्होटिंगची मोजणी होते

2/9

 पहिल्या दोन नंबरची मतं घेतलेल्या उमेदवारांच्या मतांमधील तफावत पाहून मोजणी केली जाते

3/9

गरज भासली तरच टेंडर व्होटिंगची मतमोजणी होते. 

4/9

मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदानाचा हक्क बजावता येतो. 

5/9

बोगस मतदान झाल्याची खात्री करून मतदाराला मतपत्रिका दिली जाते. 

6/9

'17 ब' चा अर्ज दाखल करताना मतदाराचा अंगठा घेतला जातो

7/9

 निवडणूक अधिका-याकडे 17 ब क्रमांकाचा तक्रार अर्ज करावा लागतो. 

8/9

एखाद्या मतदाराच्या नावावर बोगस मतदान झालं तर टेंडर व्होटिंगचा अधिकार बजावता येतो

9/9

एखाद्या मतदाराच्या नावावर बोगस मतदान झालं तर टेंडर व्होटिंगचा अधिकार बजावता येतो.