प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचं नाव माहितीये? जाणून घ्या रामायणातील रहस्यमयी संदर्भ

Ramayana: प्रभू श्रीराम हे रुप डोळ्यांसमोर उभं राहिलं की त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक गोष्टी समोर येताता आणि सारे भारावून जातात. अशीच काही रहस्य इथं वाचा...   

सायली पाटील | Updated: Jan 15, 2024, 11:48 AM IST
प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचं नाव माहितीये? जाणून घ्या रामायणातील रहस्यमयी संदर्भ  title=
Ayodhya ram mandir who was sister of Lord Rama interesting facts

Ramayana Interesting Facts  : अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir) राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच तत्पूर्वी प्रभू श्रीराम, अयोध्या, मिथीलानगरी या आणि अशा अनेक गोष्टींसंदर्भातील कुतूहल दुपटीनं वाढलं आहे. जानकीपती प्रभू श्रीराम यांच्या जीवनातून अनेक गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. रामायण या ऋषी वाल्मिकी यांच्याद्वारे रचलेल्या महाकाव्यातून साक्षात श्रीराम, राजा दशरथ यांचा काळ डोळ्यापुढं उभा राहण्यास मदत झाली. पुढे हे रामायण महाकाव्य संतमंडळी, वेद-शास्त्रांच्या माध्यमातून विविध रुपांमध्ये समोर आलं. 

रामायणातील मूळ पात्र तर जवळपास सर्वांनाच ठाऊक आहेत. पण, काही पात्र अशीही आहेत ज्यांच्याविषयी सर्वांनाच फार कमी माहिती आहे. त्यातलं एक म्हणजे प्रभू श्रीराम यांची बहीण. श्रीराम यांचे भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आहेत असं, एका क्षणात सांगता येतं. पण, त्यांच्या बहिणीचं नाव तुम्हाला माहितीये ? 

कोण होती साक्षात प्रभू श्रीराम यांची बहीण? 

प्रभू श्रीराम यांना एक बहीण होती. सर्व भावंडांमध्ये ही बहीण सर्वात मोठी असल्याचे संदर्भ सांगितले जातात. रामायण या महाकाव्यामध्ये प्रभू राम यांच्या बहिणीचा उल्लेख फार कमी आढळतो. असे संदर्भ आहेत की, त्यांच्या बहिणीचं नाव होतं शांता. राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांची ही लेक. दशरथ राजानं त्यांची ही लेक दत्तक दिली होती. उपलब्ध संदर्भांनुसार राजा दशरथानं आपले मित्र आणि अंग देशाचे राजा रोमपाद यांना कोणतीही संतान नसल्यामुळं ही मुलगी दत्तक दिली होती. 

हेसुद्धा वाचा : हळद- कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती? आरोग्याशी कसा आहे संबंध? 

रामायणातील इतर काही रहस्यही पाहा... 

  • प्रभू श्रीराम यांच्याकडे अनेक दिव्यास्त्र होती. त्यातलंच एक म्हणजे ब्रह्मास्त्र. श्रीराम यांच्याकडे आणखी एक दिव्य अस्त्र होतं. ते म्हणजे कोदंड. 
  • वाल्मिकी रामायणानुसार प्रभू श्रीराम सीता स्वयंवरात सहभागी झाले नव्हते. ज्यावेळी ते ऋषी विश्वामित्र यांच्यासह जनकपुरीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी शिवधनुष्य उचललं आणि ते भंग पावलं. त्याचनंतर माता सीता आणि श्रीराम याचा विवाह झाला. 
  • ग्रंथांमध्ये असणाऱ्या उल्लेखानुसार राजा दशरथानं पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ज्ञ केला होता. त्यातूनस त्यांना फलस्वरुप राम, लक्ष्मण, भरत आणि शस्त्रुघ्न अशी पुत्रप्राप्ती झाली. 
  • माता सीता आणि प्रभू श्रीराम यांचा विवाह मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी तिथीला झाला होता. दरवर्षी या तिथीला विवाह पंचमी साजरा केली जाते. 
  • असं म्हणतात की, विवाहप्रसंगी माता सीता 18 वर्षांच्या तर, प्रभू श्रीराम 27 वर्षांचे होते. 
  • रामचरितमानसनुसार खुद्द ब्रह्मदेवानं माता सीता आणि प्रभू श्रीराम यांच्या विवाहाचा मुहूर्त काढत पवित्र पत्रिका तयार केली होती.