Lionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे

Lionel Messi, FIFA Awards 2023: मेस्सीने (Lionel Messi) दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे मेस्सीचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसतायेत. यासह मेस्सीने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Updated: Feb 28, 2023, 08:46 AM IST
Lionel Messi ने जिंकला FIFA सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब; 'या' बड्या खेळाडूला टाकलं मागे title=
Lionel Messi, FIFA

FIFA Awards 2023: अर्जेंटिनाला वर्ल्ड कप (FIFA World Cup) जिंकवून देणारा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने फिफा पुरुषांचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार (FIFA Best Mens Player award) पटकावला आहे. यादरम्यान त्याने फ्रेंचचा युवा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेला (Kylian Mbappe) मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. मेस्सी आणि एमबाब्वे यांनी गेल्या वर्षीच्या फुटबॉल विश्वचषकाच्या फायनलमध्ये (FIFA World Cup Final) जोरदार लढत दिली होती. (FIFA Awards 2023 Lionel Messi wins FIFA Best Mens Player award latest sports news)

फिफा वर्ल्ड कपमध्ये मेस्सी आणि एमबाब्वे (Messi VS Mbappe) यांनी आपापल्या संघांसाठी शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर बेस्ट खेळाडूच्या रेसमध्ये त्याने एमबाब्वेला मागे टाकलं आहे. महिला फुटबॉलपटू गटात सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार स्पॅनिश खेळाडू अलेक्सिया पुटेलासला (Alexia Putellas) देण्यात आलाय. 

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विक्रमाची बरोबरी

स्टार मेस्सीने (Lionel Messi) दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे मेस्सीचे चाहते आनंद व्यक्त करताना दिसतायेत. यासह मेस्सीने पोर्तुगालचा दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि पोलंडचा रॉबर्ट लेवांडोस्की (Robert Lewandowski) यांच्या विक्रमाची बरोबरी केल्याचं पहायला मिळतंय. या दोघांनी देखील दोन वेळा हा किताब आपल्या नावावर केला होता.

आणखी वाचा - Lionel Messi : वर्ल्ड कप खेळणार की नाही? मेस्सी भावूक होऊन म्हणाला, "मी जर खेळलो तर..."

मेस्सीला 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारने सन्मानित (Lionel Messi wins FIFA Best Mens Player award) करण्यात आलं होतं. त्यानंत आता 2022 चा किताब त्याने आपल्या नावावर केला आहे. तर दुसरीकडे रोनाल्डोने 2016 आणि 2017 मध्ये सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार जिंकला होता. तर रॉबर्ट लेवांडोस्कीने 2020 आणि 2021 मध्ये या पुस्कारावर आपलं नाव कोरलं होतं.

मेस्सीचा नाद खुळा!

अर्जेंटींना आणि वेगवेगळ्या क्लबसाठी खेळताना मेस्सीने एक दोन नाही तर 40 ट्रॉफीज जिंकल्या आहेत. मेस्सीच्या 40 पैकी 35 ट्रॉफीज त्याने बार्सिलोना क्लबसाठी खेळताना जिंकल्या आहेत. मेस्सी हा सध्या पॅरिसमधील पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून खेळतो. तर क्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर 34 ट्रॉफ्या आहेत.

आगामी वर्ल्ड कपमध्ये मेस्सी खेळणार?

आगामी वर्ल्ड कपमध्ये (Will Messi play in FIFA World Cup 2026) खेळणार की नाही? असा प्रश्न विचारला जातो. मला फुटबॉल (Football) खेळायला आवडते. मी तंदुरुस्त आहे आणि खेळाचा आनंद घेत आहे पण वर्ल्ड कप अजून दूर आहे. तोपर्यंत काय होते ते पाहावे लागेल, असं मेस्सी म्हणाला होता.