WTC Final 2023: टीम इंडियाचे 2 खेळाडू करणार तांडव; रिकी पाँटिंगने घेतली धास्ती, म्हणतो...

Ricky Ponting On WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत. अशातच मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) टीम इंडियामधील 2 खेळाडूंची धास्ती घेतली आहे. 

Updated: Jun 2, 2023, 07:34 PM IST
WTC Final 2023: टीम इंडियाचे 2 खेळाडू करणार तांडव; रिकी पाँटिंगने घेतली धास्ती, म्हणतो... title=
IND vs AUS WTC Final

IND vs AUS WTC Final: येत्या 7 तारखेपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) भिडणार आहेत. अतिमहत्त्वाच्या या सामन्याबाबत आता कमालीची उत्सुकता वाढली आहे. आयपीएलनंतर आता टीम इंडियाचे खेळाडू आता इंग्लंडमध्ये दाखल झाले. सध्या लंडनमध्ये अरुन्डेल येथे टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंची प्रॅक्टिस सुरू आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कसोटीचा वर्ल्ड कप जिंकणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) टीम इंडियामधील 2 खेळाडूंची धास्ती घेतली आहे.

ऑसी म्हणजेच ऑस्ट्रेलिया (Australia WTC 2023) संघ विराटबद्दल रणनिती आखतील, यात शंका नाही आणि पुजाराबद्दल देखील चर्चा झाली असेल. हे असे दोन खेळाडू आहेत ज्यांच्याबद्दल प्लॅन आखला पाहिजे, असं मत रिकी पाँटिंग (Ricky Ponting On WTC Final) याने व्यक्त केलं आहे. पुजारा नेहमीच ऑस्ट्रेलियन संघासाठी अडचणीचा ठरला आहे. मुख्य: त्याने ऑस्ट्रेलियाच्या पीचवर तगडं आव्हान दिलंय. ऑस्ट्रेलियाच्या संघाला हे माहितीये की, पुजाराला (Cheteshwar Pujara) बाद केल्याशिवाय हा सामना जिंकला येणार नाही, असं म्हणत रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियाला महत्त्वाचा सल्ला दिलाय.

सध्या विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फॉर्ममध्ये परत आलाय. टी-ट्वेंटी सामन्यात त्याने आपल्या नावाप्रमाणे कामगिरी केलीये. त्यामुळे एखादा खेळाडू पुन्हा फॉर्ममध्ये आला की, तो जास्त आक्रमकपणे खेळतो, त्यामुळे विराटचा फॉर्म हा ऑस्ट्रेलियासाठी अशुभ इशारा आहे, असं म्हणत रिकी पाँटिंगने भीती व्यक्त केली आहे. त्यावेळी रिकीने शुभमन गिल विषयी देखील मोठं वक्तव्य केलंय.

आणखी वाचा - दिसतंय तेवढं सोपं नाही WTC जिंकणं, ओव्हलवरचे आकडे पाहून रोहितला फुटला घाम!

शुभमन गिल (Shubman Gill) हा टीम इंडियामध्ये सध्या गाजत असलेला स्टार प्लेयर आहे. तो एक जबरदस्त युवा खेळाडू आहे, ज्याचा प्रभाव आपण आयपीएलमध्ये (IPL 2023) पाहिलाय. तो सामन्याचं गांभिर्य जाणून खेळतो. ज्याप्रकारचा शुभमन फ्रंटफूट पुल शॉट खेळतो, त्याची ऑस्ट्रेलियन बॉलर्सला तयारी करावी लागेल, असंही रिकी म्हणाला आहे.

मला वाटतं भारताला हा सामना जिंकायचा असेल तर शमीला आणखी एक पाऊल टाकावं लागेल. त्याला आपला खेळ दुसऱ्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. शमी (Mohammed Shami) ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमी आक्रमक राहिलाय. त्याच्या उसळ्या चेंडूने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना घाम फोडलाय. मैदान ऑस्ट्रेलियात असो वा भारतात, बॉल नवा असो वा जुना, शमी असलेलं कौशल्य किती धोकादायक आहे, याची जाणीव ऑस्ट्रेलियाला नक्की असेल, असंही रिकीने म्हटलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्याचे डिटेल्स 

तारीख : 7 ते 11 जून, 2023 
ठिकाण : द ओवल मैदान, लंडन 
संघ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
रिझर्व डे : 12 जून 2023