भारत-पाकिस्तान सामन्यातील ‘या’ खेळाडूचं लोटांगण व्हायरल, पाहा धमाल मीम्स

सामन्यातील आणखी एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Sep 25, 2018, 05:51 PM IST
भारत-पाकिस्तान सामन्यातील ‘या’ खेळाडूचं लोटांगण व्हायरल, पाहा धमाल मीम्स  title=

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वी दुबईमध्ये सुरु असणाऱ्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाचा दुसऱ्यांदा पराभव केला. नऊ गडी राखत भारताने हा सामना खिशात टाकला. ज्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांच्या परिने या सामन्याविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. विविध मीम्स आणि विनोद यांच्याद्वारे अनेकांनी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची खिल्लीही उडवली.

अशाच या सामन्यातील आणखी एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्यादरम्यान, १४ व्या षटकात पाकिस्तानी फलंदाज फखार झमान याने सर्वांचच लक्ष वेधत चर्चेला जणू नवा विषयच दिला.

कुलदीप यादवच्या स्लो स्वीप चेंडूला खेळण्यासाठी म्हणून फखार सरसावला.

फखारचा प्रयत्न फसला आणि तो अक्षरश: मैदानावरच पडला. नेमकं काय झालं हे काही क्षणांसाठी अनेकांना कळलंही नाही. काही कळण्याच्या आत फखारला पंचांनी बाद ठरवलं होतं.

फखारच्या फलंदाजीची ही पद्धत अवघ्या काही मिनिटांमध्येच सोशल मीडियावर मीम्सच्या रुपात व्हायरल झाली. ज्यामध्ये कोणी त्याच्या फोटोची तुलना ‘देवदास’मधील माधुरीच्या नृत्याशी केली, तर कोणी त्यावर विनोद करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, आगळ्यावेगळ्या फलंदाजीची पद्धत असणारा हा व्हिडिओ सध्या बऱ्याच अकाऊंटवरुन डिलीट करण्यात आला असला, तरीही स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मात्र ते व्हायरल होत आहेत हेही तितकच खरं.