IPL 2021 KKR vs PBKS: के एल राहुल-ख्रिस गेल ठरले अपयशी, कोलकाताचा 5 विकेट्सने दणदणीत विजय

आतापर्यंत कोलकाता संघाला 4 पराभव स्वीकारावे लागले होते ही पराभवाची साखळी तोडत कोलकाता संघाचा पंजाबवर  मिळवला विजय

Updated: Apr 27, 2021, 07:24 AM IST
IPL 2021 KKR vs PBKS: के एल राहुल-ख्रिस गेल ठरले अपयशी, कोलकाताचा 5 विकेट्सने दणदणीत विजय title=

मुंबई: पराभवाची साखळी तोडून कोलकाता संघाने पुन्हा एकदा नव्या दमात मैदानात उतरत पंजाब संघाला धूळ चारली. 5 विकेट्सने पंजाब संघावर दणदणीत विजय मिळवला आहे. कोलकाता संघाला या विजयापूर्वी 4 पराभवाचा सामना करावा लागला होता. 

पंजाब संघामध्ये के एल राहुल ने 19, मयंक अग्रवाल 31, निकोलसने 19, शाहरूख खानने 13 तर ख्रिस जॉर्डनने 30 धावांची खेळी केली. बाकी ख्रिस गेल सोडून उर्वरित खेळाडू 1 रन काढून तंबुत परतले. 

पंजाब संघाने पहिल्यादा फलंदाजी घेत 9 गडी गमावून 123 धावा केल्या. कोलकाता संघाला 124 धावांचं लक्ष्य दिलं. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16.4 ओव्हर्समध्येच 5 गडी गमावून 126 धावा पूर्ण केल्या आहेत. राहुल त्रिपाठीने 41 तर इयोन मॉर्गनने  सर्वाधिक 47 धावा केल्या. शुभमन गिलने 9 तर आंद्रे रसेलनं 10 धावांची खेळी केली आहे.

कोलकाता संघाने आपल्या दुसऱ्या विजयाचा जल्लोष केला आहे. एकीकडे 9 विकेट्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलेल्या पंजाबचा धुव्वा उडवल्याचा आनंद तर दुसरीकडे मैदानात पुन्हा पूर्ण ताकदीने उतरल्याचा आनंद संघामध्ये आहे.