'आरसीबीने गटारात पैसे फेकले...', यश दयालच्या वडिलांना आठवले लोकांचे टोमणे, म्हणाले 'प्रयागराज एक्सप्रेसची कहाणी...'

IPL 2024 RCB vs CSK, Yash Dayal: रिंकू सिंगने यश दयालला पाच सिक्स मारल्यानंतर कशा प्रकारे ट्रोल केलं गेलं, यावर यशच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 20, 2024, 04:30 PM IST
'आरसीबीने गटारात पैसे फेकले...', यश दयालच्या वडिलांना आठवले लोकांचे टोमणे, म्हणाले 'प्रयागराज एक्सप्रेसची कहाणी...' title=
Yash Dayal Father Recalls Taunts

IPL 2024 RCB vs CSK, Yash Dayal: आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याने आयपीएलच्या महत्त्वाच्या सामन्यात धोनीची विकेट काढली अन् सामना आरसीबीच्या (RCB) पारड्यात फिरवला. अखेरच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर 110 मीटर सिक्स बसल्यानंतर यश दयालने स्लोवर बॉल करत धोनीला बाहेरचा रस्ता दाखवला. यश दयालच्या चतुराईपुढे धोनीची हुशारी देखील फिकी पडली. अखेरच्या दोन बॉलमध्ये जडेजा स्ट्राईकला असताना देखील यशने एकही रन दिला नाही अन् प्लेऑफचं (IPL Playoffs) तिकीट निश्चित केलं. सामना जिंकल्यानंतर यश दयालचं कौतूक झालं. त्यानंतर यश दयालच्या वडिलांनी (Yash Dayal Father) ट्रोलिंगच्या आठवणी सांगितल्या.

गुजरात टायटन्सकडून खेळताना यश दयालने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. यश दयालनेही पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण केकेआरविरुद्धचा तिसरा सामना त्याच्यासाठी कर्दनकाळ ठरला. या सामन्यात यश दयालने आपल्या अखेरच्या ओव्हरमध्ये सलग पाच षटकार खालले अन् त्यामुळे गुजरातच्या हातातला विजय निसटला. त्यानंतर यश दयालला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याचीच आठवण यश दयालच्या वडिलांनी सांगितली आहे. 

चेन्नईविरुद्ध सामना रोमांचक स्थितीत असताना अखेरची ओव्हर यशला देण्यात आली. तेव्हा माझ्या मनात भीती होती. मी हात जोडले अन् देवाकडे प्राथर्ना केली की, 'आज पुन्हा तेच होऊ नये देवा, माझ्या मुलाला आज मदत कर' पण पहिल्या बॉलनंतर त्याने स्वत:ला ज्याप्रकारने कंट्रोल केलं ते पाहून मी खुश होतो. सामना जिंकल्यानंतर माझा आनंद गगनात मावत नव्हता, असं यशच्या वडिलांन सांगितलं.

जेव्हा यशच्या एका ओव्हरमध्ये पाच सिक्स बसले तेव्हा, माझ्या एका व्हॅट्सअॅप ग्रुपवर एक मीम्स व्हायरल झालं होतं. त्यात लिहिलं होतं की, प्रयागराज एक्सप्रेसची गोष्ट सुरू होण्याच्या आधीच संपली. त्यानंतर देखील ट्रोलिंग थांबली नव्हती. जेव्हा आरसीबीने यश दयालला 5 कोटीमध्ये खरेदी केलं. तेव्हा देखील आरसीबीला गटारात पैसे फेकण्याची सवय आहे, असं कोणीतरी म्हटलं होतं. हे सर्व पाहिल्यावर आम्हाला खुप दु:ख झालं होतं, असंही यश दयालच्या वडिलांनी म्हटलं. 

अडचणीच्या काळात खूप कमी लोक तुमच्या सोबत असतात. आज जेव्हा यशने चांगली कामगिरी केली तेव्हा अनेकांनी मला मेसेज करून अभिनंदन केलं. यश जेव्हा म्हणायचा, बंगळुरूमध्ये अखेरचे दोन सामने पहायला या, तेव्हा मी सतत सांगत होतो, आम्ही प्लेऑफमध्ये येऊ, तो म्हणायचा खूप कमी संधी आहे प्लेऑफमध्ये जायची पण मी त्याला सांगितलं मी अहमदाबादचं तिकीट काढेल, असं यशच्या वडिलांनी सांगितलं.