Rinku Singh: रिंकूचा पराक्रम पाहून Shreyas Iyer चा आनंद गगनात मावेना; थेट Video Call केला अन्...

Rinku Singh last thriller over: रिंकूचा पराक्रम पाहून कोलकाताच्या चाहत्यांनी एकच कल्ला केला. तर केकेआरचा जखमी कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) आनंद देखील गगनात मावेना झाला होता.

सौरभ तळेकर | Updated: Apr 9, 2023, 11:17 PM IST
Rinku Singh: रिंकूचा पराक्रम पाहून Shreyas Iyer चा आनंद गगनात मावेना; थेट Video Call केला अन्... title=
Shreyas Iyer On Rinku Singh

Shreyas Iyer On Rinku Singh: रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने (Kolkata Knight Riders) आपला दुसरा विजय नोंदवला आहे. अतितटीच्या सामन्यात रिंकू सिंह (Rinku Singh) याने खेचलेल्या 5 सिक्सच्या जोरावर कोलकाताने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केलाय. रिंकूच्या पाच सिक्सच्या समोर राशिद खानची (Rashid Khan hat-trick) हॅट्रिक फिक्की पडली. रिंकूचा पराक्रम पाहून कोलकाताच्या चाहत्यांनी एकच कल्ला केला. तर केकेआरचा जखमी कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) आनंद देखील गगनात मावेना झाला होता.

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सामन्यानंतर श्रेयस आणि रिंकूचा व्हिडिओ कॉल स्क्रीनशॉट (Shreyas Iyer Video Call to Rinku Singh) पोस्ट केला. या फोटोमध्ये रिंकू सिंगने लागोपाठ 5 षटकार मारताच श्रेयस अय्यरने आनंदी झाल्याचं दिसत आहे. तर सोशल मीडियावर श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

आणखी वाचा - Who Is Rinku Singh? एकेकाळी साफसफाई करणाऱ्या रिंकूने आज मैदान मारलंय; वाचा संघर्षाची कहाणी!

व्हिडिओमध्ये श्रेयस सामना जिंकल्यावर आनंदच्या भरात नाचताना दिसत आहे. श्रेयसच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावला नसल्याचं दिसतंय. श्रेयस अय्यर यंदाच्या वर्षी देखीस कोलकाताचं कर्णधारपद भूषवणार होता, परंतु पाठीच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आणि त्यामुळे यंदाच्या हंगामात नितीश राणाने संघाची जबाबदारी सांभाळली आहे.

पाहा Video - 

दरम्यान, मला विश्वास होता की मी ते करू शकतो. नितीश राणाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला शेवटपर्यंत फलंदाजी कर, असा सल्ला दिला होता. मी जास्त विचार करत नव्हतो, फक्त चेंडू आल्यावर माझे शॉट्स खेळत होतो. चेंडू माझ्या बॅटवर चांगला आला आणि मी त्यावर विश्वास ठेवला जो मैदानावर दिसून आला, असं रिंकू सिंहने (Rinku Singh) सामना झाल्यानंतर सांगितलं.