sharad pawar vs ajit pawar

प्रचारासाठी पॉवरफुल 'पवार लेडीज', लेकीसाठी आई प्रतिभा पवार मैदानात

Loksabha 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरतेय ती बारामती लोकसभा मतदारसंघाची. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी पवार विरुद्ध पवार लढत होतेय. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील सगळ्या महिला मैदानात उतरल्यात..

May 3, 2024, 06:41 PM IST

ज्यांच्याविरुद्ध लढा, त्या सुनेत्रा पवारांकडूनच 55 लाखांचं कर्ज... सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रातून खुलासा

Loksabha 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार वि. पवार अशी लढत रंगतेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Apr 18, 2024, 07:08 PM IST

बारामतीत पुन्हा काका-पुतण्या संघर्ष, अजित पवारांविरोधात शरद पवारांची चाल? कोण आहेत युगेंद्र पवार?

Pawar vs Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यामुळे पवार घराण्यातील लोकही राजकीयदृष्ट्या विभागल्या गेले. अजितदादा यांच्या बंडानंतर त्यांचे चिरंजीव पार्थ पवार त्यांच्यासोबत राहिले. तर शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार राहिले. आता पवार घराण्यातील आणखी एक तरुण चेहरा शरद पवार यांच्या साथीला येणार आहे. 

Feb 21, 2024, 06:21 PM IST

'पवार कुटुंबात कुठेही मॅचफिक्सिंग नाही, स्टॅम्पपेपरवर लिहून देतो' अजित पवारांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करुन बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी पवार कुटुंबियांच्या काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण यात कोणतंही मॅचफिक्सिंग नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत आलेल्यांबरोबर फसवणूक करायची नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

Dec 22, 2023, 05:26 PM IST

'सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले' अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar : कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

Dec 1, 2023, 01:44 PM IST

पवारांच्या कार्यक्रमाला अजितदादा नाहीच, काटेवाडीत भेटीगाठी, बारामतीत दांडी

Pawar vs Pawar : बारामतीतल्या गोंविदबागेत यंदाही दिवाळी पाडवा साजरा झाला. मात्र या सोहळ्याला अजित पवारांनी दांडी मारली. यावर आजारपणामुळे कोणी आलं नाही तर गैरसमजाचं कारण नाही असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

Nov 14, 2023, 06:35 PM IST

'ना थका हूँ ना हारा हूँ'! शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, 'या' मतदारसंघातून सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती. पण त्यानतंर पावसामुळे पुढच्या सभा थांबवल्या होत्या. आता पुन्हा एकदा शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत आणि याची सुरुवात ते बीड मतदारसंघातून करणार आहेत.

Aug 5, 2023, 04:57 PM IST

अजित पवारांचा वाढदिवस राज्यात 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार, आठवडाभर विविध कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वाढदिवस राज्यात 'अजित उत्सव' म्हणून साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. या निमित्ताने तब्बल आठवडाभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

Jul 18, 2023, 07:15 PM IST

'म्हणून आम्ही अजित पवारांबरोबर भाजपसोबत गेलो' छगन भुजबळांनी सांगितलं नेमकं काय झालं

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करुन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या रविवारी अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात सर्वाधिक टीका झाली ती शरद पवार यांचे अगदी मानले जाणारे छगन भुजबळ यांच्यावर. आता छगन भुजबळ यांनी शरद पवारांना का सोडलं याचं कारण सांगितलं आहे. 

Jul 10, 2023, 07:42 PM IST