VOTERS' ID नसेल तर 'ही' 12 ओळखपत्र दाखवून करता येईल मतदान

वोटर आयडी

मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त अर्थात वोटर आयडी नसल्यास आणि मतदार यादीमध्ये नाव असल्यास तुम्ही इतरही वैध ओळखपत्र दाखवून मतदान करू शकता.

वाहन चालक परवाना

मतदानासाठी तुम्ही पासपोर्ट, वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र किंवा अथवा राज्य शासन आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आलेलं छायाचित्र असणारं ओळखपत्र मतदानासाठी वैध असेल.

पॅन कार्ड

बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह देण्यात आलेलं पासबुक, पॅन कार्डसुद्धा मतदानासाठी वापरता येऊ शकतं.

स्मार्ट कार्ड

याशिवाय राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आलेलं स्मार्ट कार्ड मतदानासाठी वैध ठ रतं.

रोजगार ओळखपत्र

‘मनरेगा’चं रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची कागदपत्रं, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड दाखवून तुम्ही मतदान करू शकता.

विशेष ओळखपत्र

इतकंच नव्हे, तर भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्या वतीनं दिव्यांगांना देण्यात आलेलं विशेष ओळखपत्र वोटर आयडी नसल्यास मतदानासाठी वापरता येऊ शकतं.

आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

कामगार मंत्रालयाद्वारे देण्यात येणारं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा मतदानासाठी ग्राह्य धरला जाईल.

VIEW ALL

Read Next Story