आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनलचा पहिला सामना खेळवण्यात आला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना रंगला

या सामन्यासाठी बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत अनेकांनी मुंबईच्या वानखेडे मैदानावर हजेरी लावली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहेम आणि सचिन तेंडुलकरची उपस्थिती प्रमुख आकर्षण होती.

याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्टेडिअमवर हजेरी लावत लाईव्ह सामन्याच आनंद लुटला. त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.

याशिवाय बॉलिवूडमधले अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हजर होती. विराटचं शतक झाल्यानंतर अनुष्काची रियाक्शन व्हायरल झाली आहे.

स्टार अभिनेत्री कियारा अडवाणी पती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासह उपस्थित होती.

याशिवाय जॉन अब्राहम, रणबीर कूपरही उपस्थित होते त्यांच्याबरोबर दक्षिणेच्या स्टार अभिनेता दग्गुबती वेंकटेश खास सामना पाहाण्यासाठी मुबईत आला होता.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही विशेष आकर्षण ठरली. भारतीय फलंदाजांना ती चिअर करताना दिसली.

VIEW ALL

Read Next Story