पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं... हे घडलं तरी कसं?

Girl Scooty Accident Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन मुली स्कूटीसह एका घराच्या छतावर अडकलेल्या दिसतायत. पण युजर्सना प्रश्न पडलाय तो म्हणजे या मुली तिथे पोहोचल्या कशा?

राजीव कासले | Updated: Mar 15, 2024, 06:20 PM IST
पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं... हे घडलं तरी कसं? title=

Girl Scooty Accident Viral Video : इंटरनेटच्या युगात सोशल मीडियावर (Social Media) दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात.  यातले काही व्हिडिओ आपण विसरून जातो. तर काही व्हिडिओ कायमचे लक्षात राहातात. काही व्हिडिओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. तर काही व्हिडिओ आपल्याला हसायला लावतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पण त्याचबरोबर हा व्हिडिओ हे कसं शक्य झालं याचा विचार करायला लावणारा आहे. 

स्कूटीसह मुली घराच्या छतावर
सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दोन मुली स्कूटीसह घराच्या छतावर अडकलेल्या दिसतायत. छताचं मोठं नुकसान झालं असून दोन मुली स्कूटीवरच बसलेल्या दिसतायत. पण हा व्हिडिओ पाहून लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे या मुली स्कूटीसहित घराच्या छतावर पोहोचल्या तरी कशा. या मुलींना पाहण्यासाठी एकच गर्दी झालेली दिसंच. त्याचवेळी छतावर स्कूटीसह अडकलेल्या या मुलींना तिथून सोडवण्यासाठी काही जणं प्रयत्नही करताना दिसतायत.

काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या मुली वेगाने स्कूटी चालवत होत्या, त्यावेळी त्यांचं नियंत्रण सुटलं आणि स्कूटी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घराच्या छतावर चढली. सुदैवाने या मुलींना कोणतीही दुखापत झालेली नाही. पण या अपघातानंतर मुलींच्या चेहऱ्यावर हसू पसरलंय. तसंच बघ्यांनाही हसू अनावर होताना दिसतंय. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्सने 'पापा की परी' म्हणत मुलींना ट्रोल केलं आहे. स्कूटी घेऊन मुली घराच्या छतावर कशा पोहोचल्या, हाच प्रश्न सर्वांना सतावतोय.

लोकांच्या कमेंट्स
सोशल मीडियात या व्हिडिओवर अनेक कमेंटसही आल्यात. एका यूजरने म्हटलंय चुकी त्या मुलींची नाहीए, त्या घराची चूक आहे जे या मुलींच्या स्कूटीमध्ये आलं. एका युजरने (Users) म्हटलंय बेस्ट स्कूटी रायडर. तर एका युजरने या मुलींना ऑस्कर पुरस्कार द्यायला हवा असं म्हटलंय. तर एकाने चुकीच्या ठिकाणी घर बांधल्याने घर मालकाला पोलिसांनी अटक करायला हवं असं म्हटलंय. 

हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा हा आहे हे स्पष्ट झालेलं नाही. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ sachkadwahai या पेजवर शेअर करण्यात आला आहे.